Sun, Jul 21, 2019 08:35होमपेज › Pune › पबमध्ये व्यवस्थापक आणि बाउन्सरकडून ग्राहकाला मारहाण 

पबमध्ये व्यवस्थापक आणि बाउन्सरकडून ग्राहकाला मारहाण 

Published On: Apr 12 2018 10:11AM | Last Updated: Apr 12 2018 10:11AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपळे सौदागर परिसरातील स्पॉट 18 या पब व हॉटेलमध्ये व्यवस्थापक आणि बाउन्सरनी एका ग्राहकाला बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार बुधवारी रात्री बाराच्या सुमारास घडला. पोलिसांनी या प्रकरणी बाउन्सर आणि व्यवस्थापकास अटक केली आहे.

गणेश विट्ठल पिदुलकर (28, रा. हिंजवडी) याने फिर्याद दिली असून, त्याला मारहाण झाली आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश हा मित्र मैत्रिणींसोबत स्पॉट 18 या पबमध्ये गेला होता. त्‍याठिकाणी प्रत्येकी एक हजार रूपये प्रवेश फी भरून ते आत गेले. चायनीज पदार्थ खाल्ल्यानंतर जेवण मागणार होते. मात्र, हॉटेल बंद झाले असून उद्या कूपनवर राहिलेले पैसे खर्च करा असे व्यवस्थापकाने त्‍यांना सांगितले. परंतु, दुसऱ्या दिवशी ते कूपन चालणार नव्हते. यावरून वादावाद झाली. त्यावेळी व्यवस्थापक आणि बाउन्सरनी त्याला बेदम मारहाण केली. कठीण वस्तु किंवा हत्याराने डोक्यात मारल्याने त्याचे डोके फुटले आणि तो रक्तबंबाळ झाला. या प्रकाराबाबत पोलिस अधिक तपास  करत आहेत.