Mon, Sep 24, 2018 03:50होमपेज › Pune › फुटपाथवर झोपलेल्‍या नागरिकाचा डोक्यात दगड घालून खून

फुटपाथवर झोपलेल्‍या नागरिकाचा डोक्यात दगड घालून खून

Published On: Feb 28 2018 10:08AM | Last Updated: Feb 28 2018 10:08AMपुणे : प्रतिनिधी

फूटपाथवर झोपलेल्या एका भंगार गोळा करणाऱ्याचा डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरीच्या उद्देशातून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. विश्रांतवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, खून झालेल्या व्यक्‍तिची अद्याप ओळख पटलेली नाही.