Fri, Mar 22, 2019 01:27
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून 

पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून 

Published On: Dec 10 2017 9:16AM | Last Updated: Dec 10 2017 9:16AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

टोळक्याने एकाच्या डोक्यात धारदार शस्त्रांनी वार करून खून केल्याची घटना दिघी येथे घडली. गणेश अंतराम गगणे (वय, ४०, रा. दत्तनगर, दिघी) असे खून झालेल्‍याचे नाव आहे. तर, अरविंद वंजारी, तुषार, प्रमोद शेलार, निलेश कुदळे अशी खून केलेल्‍या संशयितांची नावे आहेत. 

दत्तमंदिर रस्त्यावर शनिवारी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास हा प्रकार घडला. अरविंद आणि गगणे यांच्यात पूर्वी वाद होते. या वादातून शनिवारी मध्यरात्री टोळक्याने गगणे याच्यावर हल्ला करून त्यांना ठार मारले. मारेकरी फरार झाले असून, दिघी पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.