Sun, Nov 18, 2018 05:00होमपेज › Pune › पुणे : रहाटणी येथे टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू 

पुणे : रहाटणी येथे टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

वाकड : वार्ताहर

टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सोमवार ( दि.२ ) दुपारी साडेबाराच्या  सुमारास ही घटना रहाटणी येथे घडली.संतोष चंद्रकांत साळवे (३४,रा.जयमल्हार नगर, थेरगाव ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांची पत्नी सुनीता साळवे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष साळवे पुण्यातील सदाशिव पेठेतील खासगी कंपनीत नोकरीस आहेत. सकाळी नेहमीप्रमाणे दुचाकीवरुन कामावर जात असताना हा अपघात झाला. टेम्पोची धडक बसल्याने साळवे जमिनीवर आदळले. अंगावरून चाक गेल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर साळवेंना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु उपचारापूर्वीच ते मयत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Tags : Accident, Death, Two wheeler


  •