Sat, Feb 16, 2019 04:38होमपेज › Pune › 'SHIVADI, I AM SORRY' हे फलक लावणारा अखेर सापडला 

'SHIVADI, I AM SORRY' हे फलक लावणारा अखेर सापडला 

Published On: Aug 17 2018 5:56PM | Last Updated: Aug 17 2018 5:56PMपिंपरी : प्रतिनिधी 

'SHIVDE I AM SORRY' असा मजकूर असलेले फलक शिवार चौक परिसरातील प्रत्येक विजेच्या खांबावर लावण्यात आले होते. हे कृत्य एका प्रेमवीराचे असल्याचा समज महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसाचा झाला होता. या प्रेमवीराचा पोलीस शोध घेत होते. मात्र याप्रकरणी वेगळीच माहिती उघड झाली आहे.

'पुढारी ऑनलाईन'ने ही बातमी ब्रेक करताच पोलिस यंत्रणा सतर्क झाली. पोलिसांनी संबंधित होर्डिंग मालकाला ठाण्यात बोलावून चौकशी केली. चौकशीअंती ते फलक आगामी काळात प्रदर्शित होणाऱ्या एका शॉर्ट फिल्मचे असल्याचे उघड झाले आहे. हे फलक लावण्यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे ही फ्लेक्सबाजी महागात पडण्याची शक्यता आहे.