होमपेज › Pune › माळशिरसमध्ये श्रावणी यात्रेस आजपासून प्रारंभ

माळशिरसमध्ये श्रावणी यात्रेस आजपासून प्रारंभ

Published On: Aug 13 2018 9:49AM | Last Updated: Aug 13 2018 9:49AMमाळशिरस : वार्ताहर

महादेवाचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील श्री क्षेत्र भुलेश्वर येथे श्रावणी यात्रेस आजपासून सुरुवात झाली आहे. 

पहाटे शिवलिंगास दही, दूध व पंचामृताने अभिषेक करून महाआरती झाली. मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात  आले. माळशिरस ग्रामस्थांच्यावतीने माजी सनदी अधिकारी व म्हाडाचे माजी अध्यक्ष संभाजी झेंडे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी पुणे शहरचे डीवायएसपी सुधाकर टिळेकर, पुरंदरचे गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे, जिल्‍हा परिषद सदस्य दिलीप यादव, माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके, उपसरपंच माऊली यादव, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.