Fri, Apr 26, 2019 15:21होमपेज › Pune › आळंदीत ओवसासाठी महिलांची अलोट गर्दी

आळंदीत ओवसासाठी महिलांची अलोट गर्दी

Published On: Jan 15 2018 1:43AM | Last Updated: Jan 15 2018 1:43AM

बुकमार्क करा
आळंदी : वार्ताहर 

मकर संक्रांतीनिमित्त ओवसा करण्यासाठी आळंदी पंचक्रोशीतील तसेच बाहेरगावाहूनही महिलांची अलोट गर्दी झाली होती.

महिला हजारोंच्या संख्येने संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वरमहाराज संजीवन समाधी मंदिरात दाखल झाल्या होत्या.अवघा मंदिर परिसर महिलांच्या उपस्थितीने खचाखच भरून गेला. महिलांच्या सुरक्षेचा विचार करत येथील प्रशासनाने काहीकाळ पुरुषांना मंदिरात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे महिलावर्गाला सुरक्षितपणे ओवसा लुटण्याचा व दर्शनाचा लाभ घेता आला. यामुळे महिलांना मंदिरात कसलीही कुचंबना न होता प्रवेश करता आला. या निर्णयाचे महिलावर्गाने स्वागत केले. मकर संक्रांतीनिमित्त आवा लुटण्यासह झिम्मा, फुगडी खेळण्याचा मनसोक्त आनंद महिलांनी घेतला. यानंतर संक्रांत पारंपरिक पद्धतीने साजरी करताना ताट, चमचे, वाट्या, बांगड्या अशा छोट्या छोट्या भेटवस्तू हळदी-कुंकवासोबत सुवासिनींनी एकमेकींना दिल्या. तर तरुण-तरुणींमध्ये उत्साह अधिक होता.