Mon, Apr 22, 2019 11:42होमपेज › Pune › पुणे : शोगिनी कंपनीला भीषण आग(व्हिडिओ)

पुणे : शोगिनी कंपनीला भीषण आग(व्हिडिओ)

Published On: May 03 2018 7:42AM | Last Updated: May 03 2018 7:42AMखेडशिवापूर :  वार्ताहर

पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर येथील खोपी फाट्यावर महामार्गालगत असणाऱ्या शोगिनी टेक्नोआर्ट्स कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशामन दल मोठ्या शिताफीने आग विझविण्याचा प्रयत्‍न करीत आहे. पहाटे पाच वाजून दहा मिनिटांनी लागलेली आग साडेसहा वाजेपर्यंत सुरुच होती.

आग लागलेले डिपार्टमेंट (विभाग) प्लेटिंग जॉब करण्याचे असून, या मध्ये अनेक रसायन(केमिकल) असल्याने आग विझवण्यास अडचण निर्माण होत आहे. एका ठिकाणची आग विझली की पुन्हा पाच मिनिटांनी दुसऱ्या बाजूला आग लागत आहे. अग्निशामक दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत असताना स्थानिक नागरिकही आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Tags : pune, shogini company, fire