Wed, Jul 24, 2019 14:37होमपेज › Pune › महाराष्‍ट्र बंद पुणे Live : पुण्यामध्ये आंदोलनाला हिंसक वळण 

पुणे Live : आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज

Published On: Aug 09 2018 11:06AM | Last Updated: Aug 09 2018 5:28PMपुणे : पुढारी ऑनलाईन

मराठा क्रांती मोर्चाकडून आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले आहे. पुण्यामधील प्रसिद्ध लक्ष्मी रोडवर पीएमटी फोडण्यात आल्याने बंदला हिंसक वळण लागले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमाव नियंत्रणाबाहेर गेल्याने तणाव निर्माण झाला. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मराठा समाजाच्या आंदोलकांनी गेटची तोडफोड केल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर आंदोलकांनी भिंतीवर चढून दिवे फोडल्याची माहिती आहे.

सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला मार्केटयार्डातील व्यापार्‍यांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवत पाठिंबा दिला आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन आणि कामगार युनियनच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंद मध्ये येथील फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा, पान, केळी विभागातील सर्व व्यापारी सहभागी झाले आहेत.

अपडेट : 

कात्रजमध्ये आंदोलकांवर पोलिसांकडून  लाठीचार्ज 

कात्रज चौकात चक्का जाम करणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर, कारमधून पोलिसांचा प्रताप आपल्या मोबाईलमध्ये कैद करणाऱ्याला पाच-सहा पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. व्हेडिओ काढणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन कात्रज चौकीला नेले असून, कात्रज चौक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयाचे दिवे फोडले

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र बंदची हाक मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततेत आंदोलन सुरू होते. मात्र अचानक हिंसक वळण लागले आहे.

सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागले. आंदोलक आक्रमक झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून तोडफोड करण्यात आली आहे. सुरक्षारक्षकाच्या केबिनच्या काचा फोडण्यात आले आहेत. तसेच कार्यालयातील दिवे फोडण्यात आले आहेत. कार्यालयाच्या भिंतीवरून जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काही आंदोलकांनी सुरक्षारक्षकाच्या केबिनवर उभे राहून आंदोलन केला आहे.

लक्ष्मी रस्ता तुळशीबाग गजबजलेल्या बाजारपेठा बंद, लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग परिसर बंद

शहरातील छोटी मोठी किराणामालाची दुकाने, ब्युटी शॉप्स, खासगी कार्यालये बँका, पेट्रोल पंप, सोनी चांदीची दुकाने, कपड्याची दुकाने, हॉटेल्स, लहान मोठ्या टपऱ्या देखील बंद असल्याचे पाहायला मिळाले. 

शहरातील उपनगरी भागात दुचाकीच्या माध्यमातून ठीक ठिकाणी रॅली काढण्यात आल्या.

पिंपरी-चिंचवड शहरात सर्व नदी घाटांवर अग्निशमन दल आणि बचाव पथके तैनात 

आंदोलनात समाजकंटक घुसून आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांवर पोलिस पाळत ठेवून 

पिंपरी चिंचवड क्रांतिकारी मौलाना अब्दुल कलाम आझाद स्मारक समिती ट्रस्टने मराठा आरक्षणास पाठिंबा व्यक्त केला

पिंपरी चिंचवड कडकडीत बंद;  तुरळक मार्गावर पीएमपीएमएलच्या बस धावत असून रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे. पिंपरी गाव, कॅम्प, संत तुकाराम नगर, भोसरी, चिंचवड गाव, वाल्हेकरवाडी, चिखली, निगडी प्राधिकरण आणि शहराच्या विविध भागातील दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. 
 

देहूरोड येथे सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या आवाहनामुळे शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. भाजीमंडईतही सर्व व्यवहार बंद, रूग्णालय, औषध विक्री, आणि वर्तमानपत्र विक्रीला सूट,

देहूरोड येथे मोर्चा काढून सेंट्रलचौकात महामार्ग अडविण्यात आला. तर किवळे येथे आंदोलकांनी द्रुतगती मार्गावर ठिय्या मांडला. रावेत येथून दुचाकी रॅली काढण्यात आली. दिवसभरात कुठलाही अनुचित प्रकार नाही.

देहूरोड परिसरात महाराष्ट्र बंदचा प्रभाव, बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद, किवळे येथे मुकाई मुकाई चौकात ठिय्या आंदोलन, द्रुतगती मार्गावर काही काळ आंदोलकांनी बैठक मारली, देहूरोड येथे सेंट्रल चौकात रास्तारोको आंदोलन.

हिंजवडी विप्रो सर्कल येथे आंदोलकांचा ठिय्या

मुंढव्यातील महात्मा फुले चौकात १० मिनिटे रास्ता रोको..

वाघोली, केसनंद, अष्टपूर परिसरात कडकडीत बंद

नेहमी प्रचंड वर्दळीच्या मुंढव्यातील महात्मा फुले चौकात शुकशुकाट..

सरकारविरोधी घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला

केशवनगर-मुंढवा भागातून मोर्चा निघाला. महात्मा फुले चौकात ठिय्या आंदोलन..

कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे बंदबाबद भूमिका मांडताना

आंबेगाव, भारती विद्यापीठ येथे मराठा समाजाची रॅली, अबालवृद्धांचा सहभाग

पुणे : महाराष्‍ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी भूमिका मांडली

हडपसर येथे ही दुकानदारांनी ठेवला कडकडीत बंद

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने हडपसर येथे रॅली

पोलिसांचा खडा पहारा

सोलापूर रोड वरही पोलिस तैनात, रस्त्यावर किरकोळ वाहतूक

पीएमपीएल च्या ठराविक बसेस हडपसर येथे  रस्त्यावर

शहरातील गजबजलेल्या फर्ग्युसन रस्‍त्यावर दुकानदारांनी स्‍वयंस्‍फूर्तीने दुकाने बंद ठेवली

फुले व्यापार्‍यांचा बंदमध्ये सहभाग