Sat, Jul 20, 2019 15:07होमपेज › Pune › पुण्यात प्रेमप्रकरणातून तरुणीचे अपहरण करून खून

पुण्यात प्रेमप्रकरणातून तरुणीचे अपहरण करून खून

Published On: Mar 24 2018 11:43AM | Last Updated: Mar 24 2018 11:42AMपुणे : प्रतिनिधी

प्रेम प्रकणातून तरुणी ब्लॅकमेल करत असल्याच्या कारणामुळे प्रियकराने तिचे अपहरणकरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खुनानंतर तिचा मृत्यदेह वाघजाई डोंगरात फेकून दिला आहे. 

गेल्या आठ दिवसांपासून तरुणी वारजे येथून बेपत्ता होती. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे.

प्रेरणा कांबळे (वय १९, शिवणे, वारजे) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे, तर या प्रकरणी पोलिसांनी विपूल शहा (वय ३२, वारजे) याला अटक केली आहे. आरोपी विपूल याचे व तरुणीचे प्रेम प्रकरण सुरू होते. मात्र, तरुणी ब्लॅकमेल करून त्याच्याकडे पैसे मागत होती. 

त्यातूनच तरुणीचे वारजेतून गेल्या आठवड्यात गुरुवारी (१५ मार्च) वारजे माळवाडी येथून बेपत्ता झाली. त्यानंतर तिचा शोध घेण्यात आला. मात्र ती मिळून आली नाही. त्यांनतर याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. वारजे पोलिस शोध घेत असताना तरुणीचा ग्रामीण पोलिसांच्या पौड पोलिस ठाण्याच्या परिसरातील वाघजाई डोंगर भागत तिचा मृत्यदेह शुक्रवारी मिळाला. त्यानंतर तिचा खून झाल्याचे समोर आले.