Fri, Jul 19, 2019 07:05होमपेज › Pune › "प्रेमासाठी वाटेल ते "प्रेमवीराचा फलक लावून माफीनामा"

"प्रेमासाठी वाटेल ते "प्रेमवीराचा फलक लावून माफीनामा"

Published On: Aug 17 2018 1:44PM | Last Updated: Aug 17 2018 1:43PMपिंपरी : प्रतिनिधी 

प्रेम म्‍हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं असं जरी म्‍हणण्यात आलं असलं तरी प्रत्येकाची प्रमे करण्याची रित आणि पद्धत वेगळीच असते. जगात प्रेमाच्या अनेक कथा सांगितल्या जातात. त्या कधी सफलतेच्या तर कधी विफलतेच्या असतात. प्रेम म्‍हटलं की, रुसवे फुगवे, हलक हलकं भांडण असं एक ना अनेक पद्धतीचं प्रेम. 

पुण्यातील पिंपरी चिंचवडकरांना आज प्रेमाची एक वेगळीच अनुभूती अनुभवायला मिळाली. येथील एका प्रेमवेड्याने आपल्या प्रियेसीचा राग घालवण्यासाठी आणि तिची माफी मागण्यासाठी त्याने शहरात जाहीरात फलक बनवून माफी मागितली आहे. 

'SHIVDE I AM SORRY' असा मजकूर असलेले फलक शिवार चौक परिसरातील प्रत्येक विजेच्या खांबावर लावण्यात आले आहेत.  प्रेमविराच्या या प्रतापामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तर डोक्यालाच हात लावला आहे. या प्रेमवीराचा पोलीस आता शोध घेत आहेत.