Sun, Aug 25, 2019 12:50होमपेज › Pune › शंकर महाराज उड्डाणपूल झळाळला

शंकर महाराज उड्डाणपूल झळाळला

Published On: Apr 17 2018 1:51AM | Last Updated: Apr 17 2018 12:14AMधनकवडी : वार्ताहर 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त  धनकवडी येथील श्री सदगुरू शंकर महाराज उड्डाणपूल विद्युत रोषणाईने उजळला. सातारा रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर व्हावी या उद्देशाने उभारण्यात आलेल्या या  उड्डाणपुलाचे लोकार्पण तीन वर्षापूर्वी करण्यात आले. त्यानंतर वर्षभराने या उड्डाणपुलाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. सण, उत्सव, जयंतीनिमित्त रंगीबेरंगी विद्युत दिव्यांनी उड्डाणपूल उजळून जात आहे. सातारा रस्ता परिसरातील हा उड्डाणपूल विद्युत रोषणाईमुळे लक्षवेधी ठरत आहे.

गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, दिवाळी, गुढीपाडवा व जयंती निमित्त या उड्डाणपूल उजळला जातो. याच पार्श्‍वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उड्डाणपुलाला निळ्या रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

माजी महापौर दत्तात्रय धनकवडे म्हणाले की, उड्डाणपूल ही शहराच्या वाहतूक व्यवस्थेतील प्रमुख घटक बनत चालले आहेत. या पुलामुळे या भागातील वाहतूक कोंडी सुरळीत होण्यास उड्डाणपुलाची मदत झाली आहे. त्याला आणखी आकर्षकपणा यावा या हेतुने विद्युत रोषणाईसाठी केलेला प्रयत्न यशस्वी झाला आहे. असा उड्डाणपुल पुणे शहरातील एकमेव आहे.