Tue, Nov 20, 2018 23:03होमपेज › Pune › पुणे : उसतोड मजूराच्या मुलावर बिबट्याचा हल्ला

पुणे : उसतोड मजूराच्या मुलावर बिबट्याचा हल्ला

Published On: May 18 2018 1:32PM | Last Updated: May 18 2018 1:32PMकोरेगाव भीमा : वार्ताहर

वनविभागाच्या गलथान कारभारामुळे पुणे जिल्ह्यातील आपटी (ता. शिरूर) येथे ऊसतोड मजुराच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मुलावर वढू बुद्रुक येथील केईएम हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

डोक्याला व पाठीवर जखमा असल्याने पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. या हल्‍ल्यात जखमी झालेल्या मुलाचे नाव सुनील नवलसिंग फुलपगारे आहे. या घटनेमुळे गरिकांतून संताप व्‍यक्‍त होत आहे.