Sat, Jul 20, 2019 21:24होमपेज › Pune › सिंहगड घाट मार्गावर दरड कोसळली; रस्ता बंद 

सिंहगड घाट मार्गावर दरड कोसळली; रस्ता बंद 

Published On: Jul 08 2018 2:44PM | Last Updated: Jul 08 2018 2:44PMखडकवासला (जि. पुणे) : वार्ताहर 

सिंहगडाच्या घाट रस्त्यावर शनिवारी रात्री  मोठी दरड कोसळल्याने आज रविवार सकाळपासून घाट रस्ता बंद करण्यात आला. जेसीबी मशीनच्या सहाय्याने रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे. रात्रीच्या सुमारास दरड कोसळल्याने सुदैवाने  मोठी  दुर्घटना टळली. गेल्या आठवड्यातही घाट रस्त्यावर दरड कोसळली होती. 

गेल्या वर्षी अडीच कोटी रुपये खर्च करून दरडी संरक्षित करण्यात आल्या होत्या. त्याच्या शेजारीच असलेल्या मोठ्या कठड्यातील धोकादायक दरड कोसळल्याने पावसाळ्यात  घाट रस्त्यावरील वाहतूक असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पर्यटकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. वनखात्याचे तसेच स्थानिक वनसंरक्षण समितीचे सुरक्षा रक्षक सकाळपासून दरड हटविण्यासाठी धावपळ करत आहेत.