Sun, Jul 21, 2019 05:35होमपेज › Pune › ‘लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे काम विधायकच’ 

‘लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे काम विधायकच’ 

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 10 2018 12:45AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

आद्यक्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे राष्ट्रीय स्मारक समिती या संस्थेचे काम हे स्मारक उभारणीचे आहे. याव्यतिरिक्त संस्था इतर कुठल्याही वैचारिकतेला पाठिंबा देत नसून मच्छिंद्र सकटे, कन्हैया कुमार यांच्या सावधान परिषदेशी लहुजी स्मारक समिती संगमवाडी या संस्थेचा सावधान परिषदेशी काहीही संबध नसल्याचे समितीच्या पदाधिकार्यांनी सांगितले आहे.

28 जानेवारीला शहरात सावधान परिषद आयोजित करण्यात आली आहे. शहरातील मातंग समाजातील प्रमुख संघटना व स्मारक समितीचा या होणार्या परिषदेस पाठिंबा असल्याचे पसरवले जात असल्यामुळे, हा समज साफ खोटा असून आमच्या संस्थेच्या नावालौकीकास बाधा पोहोचत असल्याने स्मारक समितीतर्फे मच्छिंद्र सकटे यांचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. 7 जानेवारीला मातंग समाजाच्या प्रश्नांबाबत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत स्मारकाबाबत मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेचा आढावा घेण्यात आला होता. या ठिकाणी दलित महासंघ संघटेनेविषयी चर्चा करण्यासाठी मच्छिंद्र सकटे उपस्थित होते. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्मारक समितीचा उल्लेख केला. याचा समिती निषेध करत आहे. मात्र, कन्हैया कुमार यांना घेऊन सावधान परिषद घेण्याबाबत विषय या बैठकीत झाला नव्हता.