Wed, Jul 24, 2019 06:21होमपेज › Pune › कोरेगाव-भीमा प्रकरण; सकाळपासून सहाजणांना अटक

कोरेगाव-भीमा प्रकरण; सकाळपासून सहाजणांना अटक

Published On: Jun 06 2018 8:15AM | Last Updated: Jun 06 2018 2:08PMपुणे : प्रतिनिधी

भीमा-कोरेगाव दंगलप्रकरणी पुणे पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी मध्यरात्री नागपूर, मुंबई आणि दिल्लीतून तिघांना अटक केली.त्यानंतरही पोलिसांचे अटकसत्र सुरूच असून याप्रकरणी आणखी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या अटकसत्रामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. 

शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे, नक्षलवाद्याशी संबध असल्याचा आरोप असलेले तसेच नागपूर येथील वकील सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत आणि शोमा सेन यांना अटक करण्यात आली आहे. तसेच, विशेष पोलिस पथकाने राणा जेकब आणि रोना विल्सन  यांना दिल्लीतून ताब्यात घेतले. 

दरम्यान, गेल्या महिन्यातच पुणे पोलिसांनी तिघांच्याही घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. त्यानंतर पोलिसांनी काही कागदपत्रे जप्त केली होती.

 वाचा : कोण आहेत अ‍ॅड. गडलिंग आणि सुधीर ढवळे?

१ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे दोन गटात हिंसाचार झाला होता. त्यानंतर राज्यात याचे पडसाद उमटले होते. यात शेकडो वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. दरम्यान याप्रकरणी मिलिंंद एकबोटे आणि भिडे गुरुजी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांनतर  मिलिंंद एकबोटेंना अटक केली होती.

दरम्यान, या दंगलीपूर्वी शनिवार वाड्यावर एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी याठिकाणी प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सुरू असताना या तिघांचे कनेक्शन यात आढळून आले होते. त्यावेळी पुणे पोलिसांनी गेल्या महिन्यात तिघांच्याही घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. 

Tags : koregaon bhima riots, elgar prishad, organizer sudhir dhawle,shanivar wada pune,  police arrested organizer  of elgar prishad