Fri, Jul 19, 2019 15:41होमपेज › Pune › पुणे : केडगाव येथील प्लॅटफॉर्मला डबे घासून अपघात 

पुणे : केडगाव येथील प्लॅटफॉर्मला डबे घासून अपघात 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

केडगाव स्थानकात रेल्वेचे डबे प्लॅटफॉर्मला घासल्याने बुधवारी अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार कर्जत-बारामती पॅसेंजर सायंकाळी ६.४५ वाजता पुण्यातून सुटली. खुटबाव व केडगाव स्थानकादरम्यान पॅसेंजरच्या चालकाने गाडीचा वेग वाढवला. केडगाव स्थानकात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गाडी शिरत असताना वेग कमी करणे गरजेचे असताना चालकाने वेग नियंत्रित केला नाही. त्यामुळे गाडीचे पुढील ४-५ डबे प्लॅटफॉर्मच्या कठड्याला धडकून मोठा आवाज झाला.

या घटनेमुळे डब्यांना प्रचंड हादरे बसत ठिणगी पडली. हादर्‍यामुळे गाडीतील ४-५ प्रवासी बाहेर फेकले गेल्याचे वृत्त असून ते जखमी आहेत, अशी माहिती देण्यात आली. दरम्यान, संतप्त प्रवाशांनी पॅसेंजर काही काळ रोखून धरली होती.


  •