Mon, Apr 22, 2019 15:42होमपेज › Pune › द्रुतगतीवर दहा गाड्या एकमेकांवर आदळल्या

द्रुतगतीवर दहा गाड्या एकमेकांवर आदळल्या

Published On: Dec 06 2017 1:42AM | Last Updated: Dec 06 2017 12:30AM

बुकमार्क करा

कामशेत : वार्ताहर 

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेत बोगद्यामध्ये दहा गाड्यांचा विचित्र अपघात झाला. रस्त्यावर सांडलेले ऑईल आणि पडलेल्या पावसामुळे रस्ता निसरडा झाला आहे. त्यामुळे हा अपघात झाला असल्याचे पोलिसांनी  सांगितले आहे. हा अपघात सोमवारी (दि.4) रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान झाला. या अपघातात  कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या अपघातामध्ये मारुती इको (एमएच 48 एएल 3573), पिकअप (एमएच 14 जीडी 8511), टोयोटो (एमएच 12 केएन 3323), टेम्पो (जीजे 01 एफटी 0837), स्विफ्ट डिझायर (एमएच 04 जीई 6772) तसेच एक एसटी आणि एशियाड बस यांचा समावेश आहे.

मुंबई- पुणे लेनवर वाहनांमधून सांडलेले ऑईल आणि पावसामुळे रस्ते निसरडे झाले आहेत. सोमवारी (दि. 4) रात्री या लेनवर एक गाडी घसरल्याने मागील गाडीने ब्रेक मारला. अचानक ब्रेक मारल्याने या गाडीमागील इतर गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातामुळे काही वेळाकरिता वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र महामार्ग पोलिसांनी 
अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही अपघातग्रस्त वाहनचालक घटनेनंतर निघून गेले आहेत तर काही जणांनी कामशेत पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अचानक पडत असलेल्या पावसामुळे रस्ते निसरडे झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी आपली वाहने चालवताना काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या अपघातातील पुढील तपास पोलिस नाईक संतोष घोलप हे करत आहेत.