Sun, Nov 18, 2018 09:28होमपेज › Pune › बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्याचा मार्ग मोकळा; आंदोलन मागे

बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्याचा मार्ग मोकळा; आंदोलन मागे

Published On: Mar 05 2018 3:05PM | Last Updated: Mar 05 2018 3:05PMपुणे : प्रतिनिधी 

राज्यातील सुमारे १५ लाख बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील कनिष्‍ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्‍कार आंदोलन आज मागे घेतले. मागण्यांबाबत शिक्षणमंत्र्यांशी सकारात्‍मक चर्चा झाल्याने आंदोलन मागे घेत असल्याचे शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल देशमुख यांनी सांगितले. 

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. त्यामुळे बारावीचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. यावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शासनाने मागण्यांची पुर्तता करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे राज्यभरात उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला शिक्षकांचा बहिष्कार मागे घेतल्याचे महासंघाचे अध्यक्ष देशमुख यांनी सांगितले.