Sat, May 25, 2019 23:35होमपेज › Pune › बँकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने वकिलाला घातला 5 लाखांना गंडा

बँकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने वकिलाला घातला 5 लाखांना गंडा

Published On: Feb 07 2018 1:47AM | Last Updated: Feb 07 2018 1:02AMपुणे : प्रतिनिधी

बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका वकिलाला आठ जणांनी तब्बल 5 लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणी गणेश सूर्यकांत झुरूंगे (वय 31, रा. मुंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विशाल माथुर, सॅम्युएला लाल, राजेश अग्रवाल, सुमित बन्सल यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश झुरूंगे हे वकील असून, ते शिवाजीनगर न्यायालयात प्रॅक्टीस करतात.

दरम्यान त्यांना एका क्रमांकावरून फोन आला. तसेच, आम्ही वेगवेगळ्या बँकांमध्ये नोकरी लावतो. तसेच, त्यासाठी कमिशन द्यावे लागेल, असे सांगितले. त्यानुसार, फिर्यादी यांच्याकडून अर्ज, पडताळणी तसेच कमिशन अशा वेगवेगळ्या कारणाने  एकूण 5 लाख 21 हजार रुपये उकळण्यात आले. पैसे देऊनही नोकरी न लागल्याने त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. हा प्रकार 18 मे ते 28 सप्टेंबर 2017 या कालावधीत झाला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) एम. जे. जगताप हे करत आहेत.