Wed, Apr 24, 2019 16:29होमपेज › Pune › कांचनताई परुळेकर यांना 'जीवनसाधना गौरव'

कांचनताई परुळेकर यांना 'जीवनसाधना गौरव'

Published On: Feb 02 2018 10:48PM | Last Updated: Feb 02 2018 10:48PMपुणे : पुढारी ऑनलाईन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून दिला जाणारा जीवनसाधना गौरव पुरस्‍कार समाजसेविका कांचनताई बाळकृष्‍ण परुळेकर यांना जाहीर झाला आहे. विद्यापीठाचा शनिवार, दि. १० फेब्रुवारी रोजी वर्धापन दिन होणार असून या दिवशी हा पुरस्‍कार देण्यात येईल.

कांचनताई यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ व उल्‍लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्‍कार देण्यात येईल. विद्यापीठाकडून दरवर्षी विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या उल्‍लेखनीय कामगिरीसाठी पुरस्‍काराने सन्‍मानित करण्यात येते.