Wed, Jan 23, 2019 10:40होमपेज › Pune › जितेंद्र जगताप आत्महत्या : नगरसेवकाचा शोध सुरु

जितेंद्र जगताप आत्महत्या : नगरसेवकाचा शोध सुरु

Published On: Jun 04 2018 1:30PM | Last Updated: Jun 04 2018 1:30PMपुणे  : प्रतिनिधी 

जितेंद्र जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. जगताप यांनी आत्महत्येपुर्वी चिठ्टी लिहून सात जणांची नावे लिहली होती. त्यातील सातपैकी पाच जणांना अटक केली आहे. तर दोन जण अद्याप फरार आहेत त्यात नगरसेवक दिपक मानकर यांचा समावेश आहे.  त्याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विनोद रमेश भोळे, सुधीर दत्तात्रय सुतार, अमित उत्तम तनपुरे, अतुल शांताराम पवार, निशांत श्रीरंग कांबळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर त्यांचे इतर दोन साथीदारांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. 

शनिवारी दुपारी जितेंद्र जगताप यांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली होती. त्यांनी आत्महत्येपुर्वी सात जणांसोबत फोटो काढले होते. आत्महत्येपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी दीपक मानकर, सुधीर कर्नाटकी व फोटोतील व्यक्ती कारणीभूत असल्याचे नमूद केले होते. याप्रकरणी जगताप यांचा मुलगा जयेश जगताप याने दिलेल्या फिर्यादीनुसार नगरसेवक दीपक मानकर, सुधीर कर्नाटकी व फोटोतील सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील पाच जणांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. इतर दोघांचा शोध सुरु आहे. 
 

Tags : pune, pune news, jitendra jagtap suicide case, corporator deepak mankar Absconded,  search operation