Fri, Jul 19, 2019 17:56होमपेज › Pune › राज्यात पुन्हा राष्ट्रवादी एक नंबरचा पक्ष होईल

राज्यात पुन्हा राष्ट्रवादी एक नंबरचा पक्ष होईल

Published On: Jun 02 2018 2:03AM | Last Updated: Jun 01 2018 11:39PMपिंपरी : प्रतिनिधी

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार साहेबांचे कर्तृत्व  आणि विचारधारेमुळे राज्यात पुन्हा राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष एक नंबरचा पक्ष म्हणून नावारूपास येईल. राज्यातील जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या अस्वस्थांची मने सांधण्याचे काम आपल्यास करावयाचे आहे,  असे मत राष्ट्रवादी चे  प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

माजी आमदार  विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त  विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍यांचा गुणगौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होेते. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप, माजी आ. विलास लांडे,  राष्ट्रवादीचे  शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने, माजी महापौर रंगनाथ फुगे, हनुमंत भोसले, मोहिनी लांडे, योगेश बहल, वैशाली घोडेकर,   बापूसाहेब भेगडे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा नगरसेविका वैशाली काळभोर, ज्येष्ठ माजी नगरसेवक वसंत लोंढे, नगरसेवक अजित गव्हाणे, संजय वाबळे यांच्यासह भोसरी विधानसभा मतदारसंघातील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. 

लांडे यांनी दहा वर्षाच्या विधानसभा काळात चांगले काम केले आहे. सर्वसामान्यांची नाळ ओळखणारा हा नेता असल्यामुळे त्यांचे नेतृत्व जपण्याचे काम आपले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील तीन्ही आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आणण्यासाठी विलास लांडे यांनी प्रयत्न करावेत,  असे पाटील म्हणाले. 

सत्कारमूर्ती विलास लांडे म्हणाले, राजकारणात कमी-जास्त होत असते. खचून न जाता जनतेची बांधिलकी मी जपण्याचा प्रयत्न करत आहे. आ. जगताप हे माझे तीन पिढ्याचे नातेवाईक आहेत. त्यामुळे कोण काय म्हणते यापेक्षा शहराच्या विकासामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. 2004 मध्ये त्यांच्यामुळे मी आमदार झालो.  2014 च्या निवडणुकींमध्ये त्यांच्याबरोबर  भाजपात गेलो असतो तर फुकट आमदार झालो असतो.  पण मला जाणवे घालावे लागले असते असा टोलाही लांडे लगावला.  यावेळी दत्ताकाका साने, संजोग वाघेरे,  दीपक मानकर यांनी आपली  मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक नगरसेवक अजित गव्हाणे यांनी केले.

विलास लांडे माझे गुरूः आ. लक्ष्मण जगताप
विलास लांडे आणि माझी मैत्री सर्वश्रुत आहे. ते राजकारणातील माझे गुरू असून ते माझे द्राणाचार्य आहेत; मात्र त्यांनी आजपर्यंत माझा अंगठा मागितला नाही. भोसरी राजकारणाचे विद्यापीठ असून पिंपरी-चिंचवड शहराचे विलासराव कुलगुरू आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी लक्ष्मणराव उभे राहू नका, असे त्यांनी सांगितले होते; परंतु मी मोठा होतो आहे म्हणून ते असे म्हणत असावेत असे वाटले. मी उभा राहिलो आणि पराभवास मला सामोरे जावे  लागले.  विलास लांडे यांना ‘आमदारांचे आमदार’ करा असे साकडे आ. जगताप यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना घातले.