Mon, Jun 17, 2019 03:24होमपेज › Pune › युपीएससी उत्तीर्ण होऊनही दिव्यांग जयंत नियुक्तीसाठी झगडतोय

दिव्यांग जयंतचे नियुक्तीसाठी पंतप्रधानांना पत्र

Published On: Aug 21 2018 11:56AM | Last Updated: Aug 21 2018 11:56AMपुणे : पुढारी ऑनलाईन

परिस्थिती कशीही असो, प्रतिकूल वा अनुकूल, यश हे तुमच्या मनस्थितीवरच अवलंबून असते. मनात जिद्द असेल, तर प्रतिकूल परिस्थितीतही उत्‍तुंग यश मिळविता येते. दिव्यांग जयंत मंकले यानेही अशाच प्रतिकूल  परिस्थिती यश मिळविले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी परीक्षेत जयंतने देशात ९२३ वी रँक मिळवली. मात्र, परीक्षा उत्तीर्ण होऊनही जयंत प्रत्यक्ष नियुक्तीसाठी गेल्‍या तीन वर्षांपासून झगडतोय. 

दिव्यांगत्वावर मात करत जयंत युपीएससीची परीक्षा चांगल्या गुणांनी पास झाला. पदभरतीची प्रक्रिया सुरु झाली, पण आतापर्यंत लागलेल्या दोन्ही याद्यांमध्ये त्याचे नावच नाही. पुढच्या आठवड्यापासून फाऊंडेशन कोर्सही सुरू होत आहे. पण याबद्दलही जयंतला काहीच कळविण्यात आले नाही. 

इंडियन फॉरेन सर्विस, इंडियन रेल्‍वे पर्सनल, इंडियन सिव्हिल उकाउंट सर्विसमध्ये रिक्‍त पदे असूनही जयंतला नोकसरीसाठी झगडावे लागत आहे ही शोकांतीका आहे.  
जयंतने याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दाद मागितली आहे. आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचे ट्वीट त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.