Sat, Feb 16, 2019 18:49होमपेज › Pune › पुण्यात लष्‍करी जवानाची आत्‍महत्या

पुण्यात लष्‍करी जवानाची आत्‍महत्या

Published On: May 14 2018 5:29PM | Last Updated: May 14 2018 5:29PMपिंपरी : प्रतिनिधी 

पुणे ग्रामीण पोलिसांच्या शिक्रापूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता भारतीय सैन्यातील जवानाने आत्‍महत्या केल्याचे प्रकरण पुढे आले आहे. रामुसिंह शुशपालसिंह राठोड असे आत्‍महत्या केलेल्या २७ वर्षीय जवानाचे नाव आहे. बोपखेल येथे आज (दि. १४) सकाळी ही घटना घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामुसिंह हे मुळचे मध्य प्रदेशातील असून सध्या बोपखेल येथे पत्‍नीसह राहत होते. ते सीएमईमध्ये शिपाई म्‍हणून कार्यरत होते. त्यांनी आज, सोमवारी सकाळी राहत्या घरात ओढणीच्या सहाय्‍याने गळफास घेतला. ही घटना पाहून त्यांच्या पत्‍नीची शुद्ध हरपली. त्यामुळे त्यांना रुग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान, आत्‍महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी अधिक तपास दिघी पोलिस करीत आहेत.