Fri, Apr 26, 2019 09:54होमपेज › Pune › पुण्यात एटीएम मशीनला भीषण आग

पुण्यात एटीएम मशीनला भीषण आग (व्हिडिओ)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

पुण्यातील सहकारनगर परिसरातील एका एटीएम माशीनला भीषण आग लागली. यात एटीएम मशीनची खोली जळून खाक झाली आहे. दरम्यान एटीएम मशीनमध्ये ठेवण्यात यणारे पैशयांची डक्त हे आग लागू न देणारे असते. त्यामुळे पैसे जळाले नसावे असा अंदाज व्‍यक्त करण्यात  येत आहे.

सहकारनगर परिसरात तुळशी बाग कॉलनी येथे सारंग सोसायटीत जनता सहकारी बँक असून, त्या शेजारी एटीएम आहे. तर, तळ मजल्यावर जिम आहे. शनिवारी सकाळी ८ वाजता अचानक मशिनला आग लागली. यात पूर्ण मशीन जळून खाक झाले आहे. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली असून, कुलिंग करण्याचे काम सुरू आहे.