Thu, Nov 15, 2018 12:01होमपेज › Pune › सासूनेच दिली जावायला मारायची सुपारी

सासूनेच दिली जावायला मारायची सुपारी

Published On: Jun 25 2018 5:41PM | Last Updated: Jun 25 2018 5:41PMपुणे : प्रतिनिधी

मुलीसोबत प्रेम विवाह करणाऱ्या जावायला सासुनेच मारण्याची सुपारी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. 1 लाखाची ही सुपारी दिली होती. त्यातील 20 हजार दिले होते. हडपसरमध्ये हा प्रकार घडला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीना अटक करून हा प्रकार उघडकीस आणला आहे.

देसाई बागवे यांनी आपला जावई सनी यादवने आपल्या मुलीसोबत प्रेम विविह केला म्हणून त्याला मारण्याची सुपारी दिली होती. आपल्या मुलीच्या पतीलाच मारण्यासाठी सुपारी दिल्याचा प्रकार ज्यावेळी पोलिसांच्या लक्षात आल्यावर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी शैलेश कांबळे, चिक्या उर्फ कुलदीप तुपे, कृष्णा राठोड आणि पवन ओव्हाळ आणि त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला पकडले आहे.