Sun, May 26, 2019 00:44होमपेज › Pune › कोपर्डी : शिक्षेची अंमलबजावणी लवकर व्हावी : अजित पवार 

कोपर्डी : शिक्षेची अंमलबजावणी लवकर व्हावी : अजित पवार 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

कोपर्डी प्रकरणातील तिन्ही दोषींना न्यायालयाने फाशीची शिक्षा आज सुनावली. या शिक्षेची आता लवकर अंमलबजावणी व्हावी असे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 

‘कोपर्डी घटनेतील त्या नराधमांना फाशी व्हावी अशी जनतेची इच्छा होती. त्यांना फाशी व्हावी म्हणून लाखोंचे मोर्चे निघाले हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. आता फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी लवकर व्हावी. समाजात संदेश गेला पाहिजे की कोणत्याही आई बहिणीकडे बघितलं तर कडक शिक्षा होऊ शकते. अशा नराधमांना कडक शिक्षा झाली तरच समाजात विध्वंसक विचार करणाऱ्यांना आळा बसेल.’असे अजित पवार यांनी म्हटले.

संबंधित बातम्या
‘कोपर्डी’ प्रकरणातील तिन्ही आरोपींना फाशी
कोपर्डीची काळीकुट्ट घटना!