Thu, Jun 20, 2019 20:40होमपेज › Pune › पिंपरी : अनधिकृत बांधकामांवर कारवाई

पिंपरी : अनधिकृत बांधकामांवर कारवाई

Published On: Jan 04 2018 6:06PM | Last Updated: Jan 04 2018 6:04PM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी  चिंचवड महापालिकेच्या ग व ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र 32 येथे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत सांगवी मधूबन गल्ली नं 10 येथील पार्किंग प्लस 4 मजले 35 हजार चौ फूट बांधकामांपैकी 10 हजार चौ फूट बांधकाम पाडण्यात आले. उर्वरित बांधकाम पडण्याची कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे. 

कार्यकारी अभियंता मनोज सेठिया यांच्या मार्गदर्शनाखाली ग व ह क्षेत्रीय कार्यालयातील 4 उपअभियंता ,6 कनिष्ठ अभियंता ,15 बिट निरीक्षक ,यांच्या पथकाने हि कारवाई केली 1 उपनिरीक्षक महापालिकेचे 15 पोलीस ,2 पोकलंड मशीन ,1 जेसीबी ,2 ट्रक ,15 मजूर यांच्या साहाय्याने हि कारवाई करण्यात आली.

 

Image may contain: outdoor

Image may contain: outdoor

Image may contain: one or more people, sky and outdoor