Thu, Feb 21, 2019 15:17होमपेज › Pune › वित्तपुरवठा झाल्यास शेतकरी समृध्द : सुभाष देशमुख 

वित्तपुरवठा झाल्यास शेतकरी समृध्द : सुभाष देशमुख 

Published On: Jul 02 2018 4:57PM | Last Updated: Jul 02 2018 4:57PMपुणे : प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या बाबतीत प्रत्येक घटकाने संवेदनशील राहणे आवश्यक असून तो समृध्द होण्यासाठी वित्तपुरवठा होणे आवश्यक आहे. शेतकरी विविध कार्यकारी सोसायटीचे सभासद झाल्याशिवाय समृध्द होणार नाही. शेतकर्‍यांनी सभासद व्हावे विविध योजनांचा लाभ घ्यावा. ज्या सोसायट्या शेतकर्‍यांना सभासद करणार नाही त्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा सहकार, पणन आणि वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी दिला. तसेच, हवेली तालुक्यातील यशवंत सहकारी साखर कारखाना या हंगामात सुरू करण्याचे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले.

राज्य सरकारने पुणे हवेली तालुका बाजार समिती पुर्नस्थापित करून वचनपुर्ती केल्याच्या निमित्ताने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना तुकाराम महाराजांची पगडी आणि भक्ती-शक्ती शिल्प देऊन सन्मान करण्यात आला. गुलटेकडी येथील निसर्ग मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या कार्यक्रमावेळी आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर आणि बाबुराव पाचर्णे यांसह शहर आणि तालुक्याचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.