Wed, Nov 21, 2018 19:38होमपेज › Pune › खडसे मंत्रीमंडळात आल्यास पक्षाचा फायदाच : गिरीष महाजन

खडसे मंत्रीमंडळात आल्यास पक्षाचा फायदाच : गिरीष महाजन

Published On: May 05 2018 2:02PM | Last Updated: May 05 2018 2:01PMपुणे : प्रतिनिधी

जमीन घोटाळ्यात आरोप असलेले एकनाथ खडसे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लीन चिट दिली आहे. कोर्टाने निर्दोष जाहीर केले तर त्यांना मंत्रिमंडळात घेण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन म्हणाले. ससून येथील अकरा मजली इमारतीच्या संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते

खडसे मंत्रिमंडळात आले तर मला आनंदच होईल. त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्याचा पक्षाला निश्चितच फायदा होईल, असेही ते म्हणाले. 

काही दिवसांपूर्वीच भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना भोसरीतील जमीन खरेदीप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लीन चिट दिली आहे. जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसेंवरील आरोप सिद्ध झाले नाहीत.