Sun, May 26, 2019 01:15होमपेज › Pune › पुणे : पतीकडून पत्नीला मुत्रपिंडाचे दान 

पुणे : पतीकडून पत्नीला मुत्रपिंडाचे दान 

Published On: Jul 13 2018 6:42PM | Last Updated: Jul 13 2018 6:42PMपुणे : प्रतिनिधी

आपण नेहमी पत्नीने पतीला मूत्रपिंडाचे दान केल्याचे ऐकतो. मात्र ससूनमध्ये पतीने पत्नीला मूत्रपिंडाचे दान देऊन तिचा जीव वाचवला आहे. आज ही शस्त्रक्रिया करण्यात आली.   

महादेवनगर, हडपसर येथील रहिवाशी गृहिणी (वय ४२ ) यांना  २०११ पासून  किडनीविकार झाला होता व त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. नंतर  ससूनमध्ये डायलिसिस सुरु केले होते.  त्यांचे पती (वय ४८) यांनी मूत्रपिंड दानाकरिता संमती दर्शवली.  ते हडपसर येथे भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करतात.  उत्तमराव गोळे घरातील एकमेव व्यक्ती कमावती असल्यामुळे मूत्रपिंडप्रत्यारोपणाचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता.  ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांना ही  बाब समजल्यावर देणगीच्या माध्यमातून या रुग्णाचे मूत्र पिंड प्रत्यारोपण करण्याचे ठरले.   

जिवंत दाता असलेले तिसरे मूत्रपिंड प्रत्यारोपण   

आज १३ जुलै  रोजी सकाळी मूत्रपिंड प्रत्यारोपन शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. या पथकात डॉक्टर सुरेश पाटणकर, डॉक्टर भालचंद्र काश्यपी,  डॉक्टर अभय सदरे, डॉक्टर निरंजन आंबेकर , डॉक्टर धनेश  कामेरकर, डॉक्टर राजेश श्रोत्री, , डॉ. अभिजीत पाटील, डॉ. अमित बंगाळे ,  डॉ.  सागर भालेराव, डॉ शंकर मुंडे,  डॉक्टर विद्या केळकर, डॉ. सुरेखा  शिंदे, डॉ. रोहित संचेती, डॉ. सुरज जाधव यांचा या पथकात समावेश होता. तसेच डॉ. हरीश टाटिया,  एम.बी. शेळके, सय्यद सिस्टर, अर्जुन राठोड यांनी  मदत केली.  हे जिवंत दाता असलेले तिसरे मूत्रपिंड प्रत्यारोपण आहे.  तर ससूनमधले एकूण सातवे आहे. 

डॉ. अजय चंदनवाले यांनी आवाहन केले आहे की,  अजून १५ रुग्ण ससूनच्या मूत्रपिंड प्रत्यारोपनाच्या प्रतीक्षा यादीवर आहेत. आणि यकृत प्रत्यारोपणसाठी ५ रुग्ण  नोंदणी प्रक्रियेत आहेत. दानशूर व्यक्ती व सेवाभावी संस्था यांनी देणगीच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा. ज्यामुळे प्रत्यारोपनाचा खर्च न परवडणारी कुटुंबे सुद्धा प्रत्यारोपनाचा पर्याय स्वीकारतील .