Wed, Nov 21, 2018 20:03होमपेज › Pune › पुणे : पत्नीशी वाद, पतीची गळफास घेऊन आत्‍महत्‍या

पुणे : पत्नीशी वाद, पतीची गळफास घेऊन आत्‍महत्‍या

Published On: Feb 12 2018 1:01PM | Last Updated: Feb 12 2018 1:01PMपिंपरी : प्रतिनिधी

घरगुती कारणावरून पत्नीशी झालेल्या वादातून नवविवाहित पतीने गळफास घेऊन स्वतःचे आयुष्य संपवले. ही घटना सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास निगडी येथे घडली. 
श्रावण गोरख कुसाळकर (२६, रा. राहुलनगर, ओटा स्कीम, निगडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत श्रावण आणि त्याची पत्नी नीता कुसाळकर यांच्यात रविवारी रात्री भांडण झाले होते. श्रावणने दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करून शिवीगाळ केली होती. हे भांडण ऐकून जवळच राहणार्‍या तिच्या बहिणीने तिला घरी घेऊन गेली. यानंतर या भांडणाचा राग मनात धरून  श्रावणने पहाटे पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोघांचे दोन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. तपास निगडी पोलिस करत आहेत.