Tue, Jul 07, 2020 04:24होमपेज › Pune › पुणे : न सांगता निघून गेलेल्या पत्नीला शोधताना झाला वाद; दाजीने केला मेव्हण्याचा खून

पुणे : न सांगता निघून गेलेल्या पत्नीला शोधताना झाला वाद; दाजीने केला मेव्हण्याचा खून

Last Updated: May 29 2020 11:55AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

घरातून न सांगता निघून गेलेल्या पत्नीचा एकत्र शोध घेत असताना झालेल्या वादातून दाजीनेच आपल्या मेव्हण्याच्या डोक्यात लाकडी बांबूने वार करून खून केला. ही घटना (दि.26) मंगळवारी अल्पबचत भवना समोरील क्वीन्स गार्डनमधील झाडीत रेल्वे रुळाच्या बाजूला घडली.अक्षय दिनेश कुलकर्णी (रा.कोथरुड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी आरोपी दाजी संतोष मंचाराम चव्हाण (वय 25,मुळ नागपूर, सध्या दारुवाला पुल) याला ताब्यात घेतलेले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीने स्वत: खून केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. 

अधिक वाचा : कोरोनामुळे लोक घरी बोलवायला घाबरतात

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी संतोष चव्हाण याची पत्नी घरातून न सांगता निघून गेली होती. त्यामुळे मेव्हणा अक्षय व दाजी संतोष हे दोघे तिचा शोध घेत होते. दरम्यान शोध घेत असताना दोघांची त्याच कारणातून भांडणे झाली. यावेळी आरोपी चव्हाण याने अक्षयला लाकडी बांबूनेे मारहाण केली. त्यात तो बेशुद्ध होऊन जागेवरच मृत झाला. त्यानंतर चव्हाण याने अक्षयचा मृतदेह तेथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात झाकून टाकला. दोन चार दिवस ईकडे-तिकडे फिरून आरोपी कुलकर्णी याने आपणहून पोलिस ठाण्यात हजर होऊन खून केल्याची कबुली दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, मृतदेह मिळून आला असून, शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे. पुढील तपास गुन्हे शाखा युनिट दोन व कोरेगाव पोलिस करीत आहेत. 

अधिक वाचा : नवऱ्याने स्मार्टफोन घेऊन दिला नाही म्हणून पत्नीने...