Thu, Jun 27, 2019 15:49



होमपेज › Pune › पतीची आत्महत्या पत्नीवर गुन्हा दाखल

पतीची आत्महत्या पत्नीवर गुन्हा दाखल

Published On: Feb 08 2018 1:52AM | Last Updated: Feb 08 2018 12:21AM



पुणे : पत्नीकडून होणार्‍या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याप्रकरणी पत्नीविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत हा लष्करात जवान असल्याचे समोर आले आहे. त्याने आत्महत्या केल्याची घटना येरवडा येथे दि. 23 जानेवारी रोजी घडली. आत्महत्येपूर्वी त्याने एका वहीत पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असून तिला शिक्षा व्हावी, असे लिहून ठेवल्याचे समोर आल्यानंतर पत्नीविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गोपालसिंग सुग्रीवसिंग चौहान (30, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड) असे मृताचे नाव आहे. तर संगीता गोपालसिंग चौहान  या महिलेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मृताची आई शीलादेवी सुग्रीवसिंग चौहान (52, चांदलोडिया, गुजरात) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संगीता चौहान हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपनिरीक्षक ए. पी. लोहार करीत आहेत.