Sun, Jun 16, 2019 12:09
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › पुणे : हॉटेल चालकाची विष पिऊन आत्महत्या

पुणे : हॉटेल चालकाची विष पिऊन आत्महत्या

Published On: Jun 19 2018 1:25PM | Last Updated: Jun 19 2018 1:25PMपुणे : प्रतिनिधी

पुण्यातील हॉटेल व्यावसायिक अमर कणसे (३५) यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याची माहिती मिळताच वारजे मालवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अमर कणसे हे वारजे माळवाडी भागात राहत होते. वारजेतील कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर त्यांचे राजमुद्रा हॉटेल आहे. आज सकाळी त्यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान त्यांच्या आत्महत्यचे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.