होमपेज › Pune › मास्टरमाईंड पर्यंत पोहचल्याचे जाणवते : डॉ. शैला दाभोलकर

मास्टरमाईंड पर्यंत पोहचल्याचे जाणवते : डॉ. शैला दाभोलकर

Published On: Aug 19 2018 12:16PM | Last Updated: Aug 19 2018 12:16PM
पुणे : प्रतिनिधी
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन पाच वर्ष झाली आहेत. प्रदर्शन पाहताना एका ठिकाणी लिहिले होते, 'मास्टर माईंड शोधला पाहिजे', हाच प्रश्न पाच वर्ष उपस्थित होत होता. मात्र आता मास्टर माईंड पर्यंत सध्या पोचल्याचे जाणवत असल्याचे प्रतिपादन डॉ. शैला दाभोलकर यांनी केले.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त पुण्यात बालगंधर्व रंग मंदिर येथे वृत्तपत्र कात्रणांच्या प्रदर्शनाचे उदघाटन डॉ. शैला दाभोलकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, मिलिंद देशमुख,  श्रीपाद ललवाणी, नंदिनी जाधव, मुग्धा दाभोलकर, अरुण जाधव आदी उपस्थित होते.  हे प्रदर्शन रविवार आणि सोमवार दोन दिवस खुले असणार आहे. 

डॉ. शैला दाभोलकर म्हणाल्या, डॉक्टर म्हणायचे की कामाचे दस्ताऐवजीकरण करण्यात आले पाहिजे. या दस्ताऐवजीकरणाचे लघूपट करण्यात यावा, याचे पुस्तक देखील झाले तर सर्वांना डॉक्टर व्यक्ती म्हणून समजतील. काही तरुणांना दाभोलकर हे खऱ्या अर्थाने या माध्यमातून समजण्यास मदत होईल.