Thu, Jun 27, 2019 09:58होमपेज › Pune › पुण्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश 

पुण्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश 

Published On: Dec 16 2017 7:31PM | Last Updated: Dec 16 2017 7:31PM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

कोरेगाव पार्क परिसरातील पंचतारांकित हॉटेलवर छापा टाकून पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला; तर छाप्यानंतर नेपाळ व भारतीय अशा दोन मुलींची सुटका केली. सुमन ऊर्फ राज, कुमार, रोहित या तिघांविरोधात कोरेगाव पार्क  पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा व भादंवि 370, 370 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क  परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये देशातील व परदेशातील मुलींकडून पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस नाईक नितीन तेलंगे यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभाग व कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने माहितीची खातरजमा करून पंचतारांकित हॉटेलमध्ये छापा टाकला. छाप्यादरम्यान मिळून आलेल्या एक नेपाळी व एक भारतीय अशा दोन मुलींची सुटका करण्यात आली.

त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणार्‍या सुमन ऊर्फ राज, कुमार, रोहित अशा तीन एजंटांविरोधात कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला; तर सुटका करण्यात आलेल्या मुलींना हडपसर येथील महंमदवाडीतील रेस्न्यू होममध्ये ठेवण्यात आले आहे. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे, गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय पाटील, सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव, महिला सहायक निरीक्षक शीतल भालेकर, कर्मचारी नितीन तेलंगे, नितीन लोंढे, सचिन कदम, रमेश लोहकरे, ननिता येळे, राजेंद्र कचरे, संदीप गायकवाड, राजेंद्र कचरे, सचिन शिंदे, संदीप गिर्‍हे, अनुराधा ठोंबरे, रूपाली चांदगुडे, सरस्वती कागणे यांच्या पथकाने केली.