Mon, Feb 18, 2019 01:19होमपेज › Pune › सासरच्या दारातच ‘तिचे’ अंत्यसंस्कार

सासरच्या दारातच ‘तिचे’ अंत्यसंस्कार

Published On: Dec 02 2017 11:23AM | Last Updated: Dec 02 2017 11:23AM

बुकमार्क करा

बावडा : प्रतिनिधी

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. अमृता दत्तात्रय कुरडे (22, रा. बावडा) असे दुर्दैवी  विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी सासरच्या 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

दरम्यान, मृत अमृताच्या पार्थिवावर माहेरकडील संतप्त झालेल्या नातेवाईकांनी बावडा येथे शुक्रवारी दुपारी 11.30 वाजणेच्या सुमारास सासरच्या घराशेजारी मोकळ्या प्रांगणात अंत्यसंस्कार केले. या प्रकरणी मुलीचे वडील पांडुरंग दामू राऊत (वय-60 वर्षे, रा. सावतामाळीनगर, इंदापूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. 

त्यावरून पोलिसांनी सचिन दत्तात्रय कुरडे (नवरा), दत्तात्रय राघू कुरडे (सासरा), जाईबाई दत्तात्रय कुरडे (सासू), राहुल दत्तात्रय कुरडे (दीर), अश्विनी दत्तात्रय कुरडे (नणंद) ( रा.सर्व बावडा, ता.इंदापूर) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.