Tue, Feb 18, 2020 01:07होमपेज › Pune › कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यांत आज अतिवृष्टीचा अंदाज 

कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यांत आज अतिवृष्टीचा अंदाज 

Published On: Sep 20 2019 1:53AM | Last Updated: Sep 20 2019 1:52AM
पुणे : कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर शुक्रवारी (दि. 20) अतिवृष्टी होईल, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. या तिन्ही जिल्ह्यांच्या उर्वरित भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळतील. शहरी भागांतही मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.

मान्सून बरसण्यासाठी पूरक ठरणारे कमी दाबाचे क्षेत्र शुक्रवारी निर्माण होत आहे. यामुळे या ठिकाणी कोसळधार अपेक्षित आहे. काही ठिकाणी पाऊस अक्षरशः झोडपून काढणार आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये रेड अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. सरासरी 150 ते 200 मि.मी. पाऊस पडेल, असे हवामान खात्याकडून नमूद करण्यात आले आहे.