Sun, Feb 17, 2019 20:13होमपेज › Pune › होल्डिंग डोक्यात पडून चहा विक्रेत्याचा मृत्यू 

होल्डिंग डोक्यात पडून चहा विक्रेत्याचा मृत्यू 

Published On: Jun 01 2018 7:41PM | Last Updated: Jun 01 2018 7:41PMपिंपरी : प्रतिनिधी 

मानसून पूर्व झालेल्या वादळी पावसात होल्डिंग डोक्यात पडून एका चहा विक्रेत्याचा मृत्यू झाला आहे. प्रफुल्ल रमेशलाल शहा (51, मोशी गावठान) असे मृत्‍यू झालेल्‍या चहा विक्रेत्‍याचे नाव आहे. हा प्रकार मोशी-आळंदी रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडला. 

प्रफुल्ल यांची मोशी आळंदी रस्त्यावर चहाची टपरी आहे. नेहमी प्रमाणे शुक्रवारी सायंकाळी ते टपरीवर काम करत होते. अचानक हवामानात बदल झाला आणि वादळी पावसाला सुरवात झाली. यामध्ये टपरीच्या वरती असलेले जहिरातिचे होल्डिंग प्रफुल्ल यांच्या डोक्यात पडल्याने ते गंभीर जखमी झाले. तत्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. 

वादळी पाऊसामुळे शहरातील पिंपरी, मोशी, संत तुकाराम नगर, पिंपळे सौदागर, सांगवी परिसरात झाडे कोलमडली तर झांडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या. यामुळे वाहतूक कोंडी झाली. अग्निशामक दलाचे अधिकारी कर्मचारी झाडे रस्त्यातून बाजूला काढण्याचे काम करत आहेत.