मुंबईत उद्या मुसळधार कोसळणार 

Last Updated: Jun 03 2020 7:00PM
Responsive image
file photo


पुणे : पुढारी ऑनलाईन

नैऋत्य मौसमी पाऊस अर्थात मान्सूनची वाटचाल गतिमान आहे. मान्सूनची दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप, मालदीवचा उर्वरित भाग, केरळचा बहुतांश भाग, तामिळनाडूचा काही भाग, नैऋत्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात वाटचाल कायम आहे, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिली आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला.

४ जून रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि आसपासच्या परिसरात ४ जून रोजी शहर व उपनगरात मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे.       

सोनिया गांधींकडून मोठा निर्णय! गुजरात काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी हार्दिक पटेल यांची वर्णी!


राज्यात कोरोनाबाधितांचा आजवरचा विक्रम मोडीत


सांगली झेडपीचे जितेंद्र डुडी नवे 'सीईओ'


मुंबई मनपाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचे कोरोनाने निधन


कोरोना : राज्यात १ लाख ६४ हजार गुन्हे दाखल


कोल्हापूर : परितेत कोरोनाबाधित सापडल्याने भोगावती परिसर हादरला


पुण्यात निर्णयांचा धडाका सुरुच; मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांची तडकाफडकी बदली!


शाळेतून पुस्तके गणवेश खरेदी करण्याची सक्ती केल्यास गुन्हे दाखल करा : मंत्री बच्चू कडू


औरंगाबाद : रस्त्यालगतच्या ५१ निराश्रीतांना आसरा


ठाणे जिल्हा १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन