होमपेज › Pune › अपंगांच्या स्वावलंबन आरोग्य विम्याचे अर्ज हाऊसफुल; लाभ बंद

अपंगांच्या स्वावलंबन आरोग्य विम्याचे अर्ज हाऊसफुल; लाभ बंद

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी प्रतिनिधी

अपंगांच्या स्वावलंबन आरोग्य विम्यासाठी अर्ज जास्त प्रमाणात आल्याने या योजनेचा लाभ देता येत नाही असे उत्तर  सामाजिक न्याय विभागाचे संचालक राव यांनी महाराष्ट्रातील अपंगांच्या शिष्टमंडळास दिल्लीत दिले. 

अपंगांच्या स्वावलंबन आरोग्य विम्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन टीमने सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे गाऱ्हाणे घातले. स्वावलंबन आरोग्य विमा योजनेत अपंगाना स्वतःसह कुटुंबातील तीन व्यक्तींसाठी दोन लाख रूपयांचा कॅशलेस विमा फक्त 357 रुपयेमध्ये मिळत होता. परंतु काही दिवसांपासून ही योजना बंद झाली आहे. या योजनेत देशातील लाखोंच्या संख्येने अपंगांनी पैसे भरले आहेत. लाभ मिळत नसल्याचे प्रहारचे राजेंद्र वाकचौरे यांनी सांगितले.

बैठकीत अपंगांचे अर्ज जास्त प्रमाणात आले असल्याने योजनेचा लाभ देता येत नाही  असे उत्तर सामाजिक न्याय विभागाचे संचालक राव यांनी दिले. शिष्टमंडळाने पैसे भरल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर सहानुभूती पुर्वक विचार करु असे ते म्हणाले.

सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मोदी सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पाच लाख रुपये  विमा योजनेत अपंगांना १०% आरक्षण ठेवून सर्व अपंगांना पाच लाखाचा विमा देऊ असे सांगितले. परंतु सरकार जर अपंगांना दोन लाखाचा विमा देऊ शकत नाही तर पाच लाखाचा कुठून देणार, म्हणजे हेही गाजरच. अशा शब्दात वाकचौरे यांनी संताप व्यक्त केला.

शिष्टमंडळात पिंपरी चिंचवड अध्यक्ष दत्तात्रय भोसले, वर्धा अध्यक्ष प्रमोद कुर्हाटकर, अहमदनगर अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, शेवगाव अध्यक्ष चांद शेख,हमिद शेख,रामचंद्र तांबे, सिद्धार्थ उरकुडे, संभाजी गुडे, आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

Tags : Pune, News, Insurence, Forms,handicaped, ramdas aathavle, politis


  •