Thu, Feb 21, 2019 15:09होमपेज › Pune › पुणे : हिंजवडीत तरुणावर जीवघेणा हल्ला 

पुणे : हिंजवडीत तरुणावर जीवघेणा हल्ला 

Published On: Aug 13 2018 11:36AM | Last Updated: Aug 13 2018 11:36AMपिंपरी : प्रतिनिधी
किरकोळ कारणाहून एका तरुणावर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना शनिवारी रात्री हिंजवडी येथे घडली.

चैतन्य भगवान डुकरे (२२, रा. मुक्ताईनगर, मारुंजी रोड, हिंजवडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश साखरे व अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी  दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी व आरोपी यांच्यात किरकोळ कारणाहून भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी आपसात संगनमत करून चैतन्य त्यांच्यावर चाकूने वार करीत ठार मारण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.