Wed, Nov 21, 2018 05:27होमपेज › Pune › जुन्या वादातून तरुणावर खुनी हल्ला

जुन्या वादातून तरुणावर खुनी हल्ला

Published On: Jun 04 2018 1:30AM | Last Updated: Jun 04 2018 12:04AMपिंपरी : प्रतिनिधी

दुपारी झालेल्या वादातून पिंपरीत संदीप वाल्हेकर या तरुणावर धारधार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आला. पिंपरी बौद्धनगर येथे ही घटना घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप वाल्हेकर याच्यावर रात्री दहा वाजता खुनी हल्ला करण्यात आला. दुपारी झालेल्या भांडणातून हा हल्ला करण्यात आला आहे. सध्या त्याच्यावर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत चा गुन्हा दाखल करण्यात येणार असून अद्याप या प्रसंगी कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.