Sat, Nov 17, 2018 07:58होमपेज › Pune › भुजबळांचा हल्लाबोल : ‘अभी हम बचे भी है और लढेंगे भी’

भुजबळांचा हल्लाबोल : ‘अभी हम बचे भी है और लढेंगे भी’

Published On: Jun 10 2018 6:51PM | Last Updated: Jun 10 2018 9:03PMपुणे : पुढारी ऑनलाईन 

गेल्या अडीच वर्षापासून भ्रष्टाचाराच्या आरोलाखाली अटकेत असलेल्या छगन भुजबळ काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटले. आज पुण्यात राष्ट्रावदी काँग्रेसच्या हल्ला बोल यात्रेचा सांगता समारंभ आहे या समारंभात भुजबळ प्रथमच पब्लिक मिटिंगमध्ये बोलत आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून भुजबळ राष्ट्रवादी सोडणार अशी चर्चा सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर पुण्याती या सभेत काय बोलतात याची सर्वांनाचा उत्सुकता आहे 
 

Live Update : 

*नोटबंदीने आया बहिणींना भिकेला लावले : पवार

*दिल्लीतील महाराष्ट्र सदन दिल्लीतील सर्वात सुंदर इमारत ती बांधणाऱ्या भुजबळांच जेलमध्ये टाकल  

*मतदानासंबधी आधी मतदार शंका घेत नव्हता, आता मशिन खर की खोट या बाबत शंका घेतात 

*पालघर मधला भाजपचा विजय खरा नाही 

*नेपाळमध्ये अजुनही जुन्या नोटा बदलून मिळतात

*एका झटक्यात ७१ हजार कोटी कर्ज माफ केले आणि भाजपवाले म्हणतात आम्ही काय केले 

*सत्ता आली म्हणून आम्ही कधी मस्तेवालपणा केला नाही 

*२० वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना भुजबळांच्या अध्यक्षतेखली झाली होती

*शरद पवारांनी जोतिबा फुलेंसारखी पगडी भुजबळांना घातली

*शरद पावारांच्या भाषणाला सुरुवात 

*आपापसात भांडत नाही तोपर्यंत एकगठ्ठा मतदान मिळत नाही आता तुम्ही ठरवा भाडांयच काय 

*ओबीसी आरक्षण पवारांमुळे 

*मराठा आरक्षण मिळाल पाहिजे. पण, मी त्याच्या विरोधात आहे असा खोटा प्रचार केला

*आजची आणीबाणी घटनेवर आधारीत नाही, याविरुध्द सगळ्यांनी एकत्र यावे 

*चार वर्षात खूप प्रगती झाली, आपलेच पोट भरत नाही भुजबळांचा उपरोधीक टोला 

*सीमेवर जवान शहीद होत आहेत आणि हे म्‍हणत आहेत नोटाबंदीनंतर दहशतवाद संपला : छगन भुजबळ

*महाराष्‍ट्र सदनाच्या कत्राटदाराची नेमणूक मी केली नव्हती, मी त्‍यावेळी मंत्रीही नव्हतो

*कुंटुबाला झालेला त्रास सांगताना भुजबळ गहिवरले

*ईडीच्या धाडीमुळे कुटुंबाला त्रास सहन करावा लागला : छगन भुजबळ

*न्यायदेवतेच्या विश्वासामुळे तुमच्यासमोर उभा  : छगन भुजबळ

*वाघ म्‍हातारा झाला म्‍हणून गवत खात नाही : : छगन भुजबळ

 

*अजित पवार, माझ्यावर २ वर्षापूर्वीच हल्लाबोल झाला : भुजबळ 

*जिथे जिथे भुजबळ तिथे तिथे धाडी पडल्या, मिळाल तर काहचि नाही पण, चर्चा खूप झाली 

*निर्दोश असल्‍याचे सिध्द केल्‍याशिवाय स्‍वस्‍थ बसणार नाही छगन भुजबळ