Wed, Jan 16, 2019 17:33होमपेज › Pune › पुणे : जीएसटी सहायक उपायुक्त लाच घेताना जाळ्यात 

पुणे : जीएसटी सहायक उपायुक्त लाच घेताना जाळ्यात 

Published On: Mar 21 2018 2:59PM | Last Updated: Mar 21 2018 2:59PMपुणे : प्रतिनिधी 

पुण्यातील जीएसटी कार्यालयातील सहायक आयुक्ताला तीस हजारांची लाच स्वीकारताना लाच लुच पत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. जीएसटी कार्यालय येरवडा येथील कॅन्टिनमध्ये ही कारवाई करण्यात आली. प्रसाद पुरुषोत्तम पाटील, (वय ४८ सहायक आयुक्त, वस्तू व सेवा कर विभाग) असे अटक केलेल्यांचे नाव आहे. 

याप्रकरणी प्रसाद नागर, वडगाव शेरी यांनी सन २०१३ मध्ये केलेल्या सिव्हिल वर्क कामाच्या वेळी पाच टक्के व्हॅट होता. त्याप्रमाणे टॅक्स तक्रारदार यांनी भरलेला होता. परंतु,  पाटील यांनी तक्रारदार यांना तुम्ही भरलेला टॅक्स कमी भरला आहे, तो 8 टक्केप्रमाणे भरायचा असून, त्याप्रमाणे तक्रारदार यांना अससेसमेंटची ऑर्डर करून दिली. याविरुद्ध अपिलमध्ये न जाण्यासाठी तक्रारदार यांचेकडून तीस हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर त्याची पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कार्यालयाच्या कॅन्टीन मध्ये सापळा रचून तीस हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले.