Thu, May 28, 2020 22:46होमपेज › Pune › जुन्या वादातून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

जुन्या वादातून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

Published On: May 10 2018 12:39PM | Last Updated: May 10 2018 10:47AMपिंपरी : प्रतिनिधी 

पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून टोळक्याने एकावर कोयत्याने वार करत, सीमेंटचा गट्टू डोक्यात घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास रहाटनी येथे घडला.
दिनेश्वर दिनकर सगर (22, रा. श्रीनगर, रहाटनी) याने फिर्याद दिली असून तो गंभीर जखमी आहे.

पोलिसांनी अनिकेत पवार, अप्पा उर्फ़ अनिकेत नखाते, गोट्या उर्फ़ आशुतोष नखाते, दद्दा नखाते, तेल्या, बबलू व इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सगर आणि अनिकेत पवार याची भांडणे झाली होती. याचा राग मनात धरुन अनिकेत आणि त्याच्या साथीदारांनी सगर यांच्यावर कोयते आणि सीमेंटच्या गट्टूने मारहाण केली. याप्रकरणाचा तपास वाकड पोलिस करत आहेत. 

Tags : group attack, pimpari, rahatani, pune news