होमपेज › Pune › गोकुळ दुधाच्या टँकरने वाहनांना उडविले

गोकुळ दुधाच्या टँकरने वाहनांना उडविले

Published On: Aug 02 2018 2:00AM | Last Updated: Aug 02 2018 12:58AMपुणे, धायरी : प्रतिनिधी

भरधाव जाणार्‍या गोंकुळ दुधाच्या टँकरने तीन कार आणि एका दुचाकीला उडविल्यानंतर झालेल्या भिषण अपघातात टँकर खाली चिरडून दोन दुचाकीस्वारांचा जागिच मृत्यू झाला. तर, तिघेजन जखमी झाले. मुंबई -बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील भूमकर चौकाजवळील वाल्हेकर प्रॉपर्टीजसमोर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यात तीन कार आणि दुचाकीचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी टँकर चालकाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान या महामार्गावर सलग दुसर्‍या दिवशी हा भिषण अपघात झाला आहे. 

कुणाल शिवाजी क्षीरसागर (वय 26, रा. हिंगणे मळा, हडपसर) आणि उमेश रमेश सुपेकर (वय 28, रा. रजनी गंधा अपार्टमेंट, भारती बँकेच्या मागे धायरी फाटा) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी टँकर चालक सुरज गौतम कुडवे (वय 33, रा. सातारा) याला पोलिासांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. तसेच, यात सखाराम किसन सूरसे (वय 37,नर्हे), अच्युत परशुराम साबळे (वय 45, रा. पाषाण) आणि बालाजी सूर्यवंशी काळे (रा.वडगांव बुद्रुक) हे तिघे जखमी झाले आहेत. टँकर चालक सुरज हा गोंकुळ दुधाचा भरलेला टँकर कोल्हापूरवरून मुंबईकडे घेऊन जात होता. दरम्यान सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुंबई-बेंगलोर महामार्गावरील भूमकर चौकात आल्यानंतर त्याचे भरधाव टँकरवरील नियत्रंण सुटले. त्यांने वाल्हेकर प्रॉपर्टीजसमोर येताच प्रथम समोरील एका चार चाकीला उडविले. 

सलग दुसर्‍या दिवशी भीषण अपघात
महामार्गावरील अपघातांची मालिका सुरुच असून, सलग दुसर्‍या दिवशी भिषण अपघात झाला असून, सोमवारी मध्यरात्री बाह्यवळण मार्गावर मित्राचा वाढदिवस साजरा करून परतणार्‍या दोन तरुणांना मद्यपी ट्रक चालकाने चिरडले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. नवीन कात्रज बोगदा ते मुठा नदीपर्यंत राष्ट्रीय महामार्गावर या परिसरात अपघात होत असून, येथे उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.