Tue, May 21, 2019 04:12होमपेज › Pune › तरुणीची सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

तरुणीची सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

Published On: Jan 29 2018 1:18PM | Last Updated: Jan 29 2018 1:18PMपुणे : प्रतिनिधी

मुंढवा परिसरातील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीने सातव्या माजवल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी सकाळी घडला.  अश्विनी गवारे (वय, 22) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. 

अश्विनी मुंढाव्यातील ग्लोबल टॅलेंट ट्रॅक या आयटी कंपनीत नोरकीस होती. गेल्या सात दिवसापासून ती रजेवर होती. आज सकाळी कंपनीत आली, त्यानंतर काही वेळाने ती इमारतीच्या सातव्या मजल्यावर गेली व तेथून उडी मारून आत्महत्या केली.

दरम्यान, तिने घरघुती वादातून आत्महत्या केल्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.